AIIMS Nagpur Bharti 2024 | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर येथे 62 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

AIIMS Nagpur Bharti 2024  नमस्कार मित्रांनो आज आपण अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून एकूण 62 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या जागांपैकी ” प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक ” या पदांकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत. 7 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची देण्यात आलेली अंतिम दिनांक आहे. या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी संस्थे कडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे. अधिक माहितीसाठी खालील देण्यात आलेला लेख पहा.

  • 62 रिक्त जागांकरिता अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर यांच्याकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपुर येथील होणाऱ्या भरती मधून प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक या पदांकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.

इंजिनियर्स इंडिया लिमिटेड येथे भरती.

AIIMS Nagpur Bharti 2024
AIIMS Nagpur Bharti 2024

AIIMS Nagpur Bharti 2024 | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे आहे.

  • प्रोफेसर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून एमबीबीएस केव्हा समतुल्य पदवी उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवारांनी ज्या संस्थेमधून पदवी उत्तीर्ण केलेली आहे आशा संस्थेला इंडियन मेडिकल कौन्सिल ची मान्यता असणे गरजेचे आहे. सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कामाचा 14 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. हा अनुभव उमेदवाराने पदवी मिळवल्यानंतर मिळवलेला असणे गरजेचे आहे. संबंधित शाखेमधून उमेदवाराने सदरील अनुभव पूर्ण केलेला असावा.
  • सुपर स्पेशालिटी विभागाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून D.M किंवा M.Ch पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कमीत कमी दोन ते तीन वर्षाचा कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
  • नॉन मेडिकल बायो केमिस्ट्री या विभागाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून बायो केमिस्ट्री किंवा मेडिकल बायो केमिस्ट्री या शाखेमधून पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर उमेदवाराकडे 14 वर्षे काम केलेला अनुभव असणे गरजेचे आहे हा अनुभव उमेदवाराने अध्यापन आणि रिसर्च या क्षेत्रामधून कमावलेला असणे गरजेचे आहे.
  • ॲडिशनल प्रोफेसर या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे 10 वर्षे शिकवण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे. हा अनुभव उमेदवाराने पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर मिळवलेला असावा. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी हा अनुभव नॅशनल मेडिकल कौन्सिल द्वारे मान्यताप्राप्त संस्थेमधून मिळवलेला असावा.
  • ॲडिशनल प्रोफेसर ( पलमोनरील मेडिसिन ) या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी दोन ते तीन वर्षाची DM डिग्री उत्तीर्ण केलेली पाहिजेत. उमेदवाराकडे एमडी डिग्री असणे आवश्यक आहे. सदरील डिग्री उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेमधून उत्तीर्ण केलेली असावी.
  • ॲडिशनल प्रोफेसर ( सुपर स्पेशालिटी ) या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित कामाचा आठ वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. हा अनुभव उमेदवाराने पदवी उत्तीर्ण केल्यानंतर मिळालेले असावा. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे सदरील कामाचा अनुभव असावा.
  • ॲडिशनल प्रोफेसर ( नॉन मेडिकल ) या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेमधून मिळवलेली पदव्युत्तर पदवी असणे गरजेचे आहे. उमेदवारांनी डॉक्टरेट पदवी मान्यताप्राप्त संस्थेमधून मिळवलेली असावी. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे 10 वर्षाचा शिकवण्याचा अनुभव असावा. उमेदवाराकडे रिसर्चमध्ये काम केलेला अनुभव असावा.
  • असोसिएट प्रोफेसर या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे सहा वर्ष अध्यापनाचा अनुभव गरजेचे आहे. हा अनुभव उमेदवाराने पदवी उत्तीर्ण केल्यानंतर मिळवलेला असावा. नॅशनल मेडिकल कौन्सिल द्वारे मान्यताप्राप्त असलेल्या विभागातून उमेदवाराने हो मिळवलेला असावा.
  • असिस्टंट प्रोफेसर या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे तीन वर्ष शिकवण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे. हा अनुभव उमेदवाराने पदवी उत्तीर्ण केल्यानंतर मिळवलेला असावा.
  • प्राध्यापक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दरमहा 1,68,900 ते 2,20,400 रुपये वेतन असणार आहे. अतिरिक्त प्राध्यापक या पदाकरिता 1,48,000 ते 2,11,400 रुपये वेतन मिळेल. सहयोगी प्राध्यापक या पदाकरिता 1,38,300 ते 209200 इतके वेतन मिळणार आहे. सहाय्यक प्राध्यापक या पदाकरिता एकूण 101500 ते 167400 रुपये वेतन दरमहा मिळणार आहे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण नागपुर असणार आहे.
  • या भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी वय मर्यादा 38 वर्षे असणार आहे.
  • सदरील भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने किंवा ऑफलाइन जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवून अर्ज करायचा आहे.
  • ” कार्यकारी संचालक, एम्स नागपूर, प्लॉट नंबर 2, सेक्टर 20, मिहान, नागपुर, महाराष्ट्र, पिन- 441108″ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत.
  • सदरील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याकरिता उमेदवारांनी येथे क्लिक करा.

AIIMS Nagpur Bharti 2024 | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर येथील भरती करिता इच्छुक उमेदवारांसाठी सूचना खालील प्रमाणे.

  • सदरील भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे किंवा ऑनलाईन देण्यात आलेल्या वेबसाईट द्वारे सदरील भरती करिता अर्ज करायचा आहे. अधिक माहिती करिता इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपुर यांच्याकडून ऑनलाइन ईमेल द्वारे अर्ज करण्याची कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी संस्थेच्या ईमेल आयडी वरती स्वतःचे अर्ज पाठवायचे नाहीत.
  • अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपुर येथील भरती करिता इच्छुक उमेदवारांनी अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणतीही चुकीची माहिती भरायची नाही. किंवा अर्ज भरत असताना कोणत्याही उमेदवारांनी खडाखोड करायची नाही. अर्जामध्ये स्वतःची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि अनुभव यासंदर्भातील माहिती उमेदवारांनी बरोबर लिहायचे आहे. चुकीची माहिती लिहिणाऱ्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.
  • 7 नोव्हेंबर 2024 या तारखेनंतर कोणत्याही उमेदवाराला सदरील भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार नाही. याची जबाबदारी सर्व उमेदवारांनी घ्यायची आहे.
  • अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपुर येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी संस्थे कडून प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. ही जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याकरिता उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचून समजून घ्यावी आणि त्यानंतर अर्ज करायला सुरुवात करावी.

AIIMS Nagpur Bharti 2024 | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपुर येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • सदरील भरती करिता ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत असे उमेदवारच या भरतीच्या प्रक्रिया मध्ये सहभागी होऊ शकतात. अर्ज न केलेल्या कोणत्याही उमेदवाराला पदावर नियुक्त करण्यात येणार नाही.
  • भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपुर येथील भरती करिता अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याकरिता कसल्याही स्वरूपाचा TA / DA देण्यात येणार नाही. याची सर्वांनी दक्षता घ्यावी.
  • भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर येथील भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवाराने अनुचित प्रकार केला आशा उमेदवारांवर भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपुर त्यांच्याद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. याची सर्व उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
  • भारतीय आयुर्विज्ञान संस्था तुमच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी त्याच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  •  अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था येथील भरती संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Leave a Comment