Madgaon Nagar Palika Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण मडगाव नगरपालिका अंतर्गत होणाऱ्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून एकूण 13 जागांकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत. ‘ कनिष्ठ विभाग लिपिक, साईट पर्यवेक्षक, सहाय्यक गवंडी ‘ या पदांकरिता सदरील भरती मधून योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. 11 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता देण्यात आलेली अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. अधिक माहिती जाणून घेण्याकरिता मडगाव नगरपालिका यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे.
- 13 रिक्त जागांकरिता मडगाव नगरपालिका यांच्याकडून भरतीचे आयोजन केलेले आहे.
- कनिष्ठ विभाग लिपिक, साईट पर्यवेक्षक, सहाय्यक गवंडी या पदांकरिता मडगाव नगरपालिका यांच्याद्वारे भरती निघालेली आहे.
Madgaon Nagar Palika Bharti 2024 | मडगाव नगरपालिका येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.
- कनिष्ठ विभाग लिपिक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 12 वी उत्तीर्ण केलेली असावी किंवा समतुल्य पदवी उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवाराने संगणक प्रशिक्षण तीन महिने कालावधीचे घेतले असल्याचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे टंकलेखन 40 शब्द प्रतिमिनिट एवढे असणे गरजेचे आहे. उमेदवाराकडे कोंकणी भाषेचे ज्ञान असणे गरजे आहे.
- साईट सुपरवायझर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून एमएससी पदवी उत्तीर्ण केलेली असावी. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
- सहाय्यक गवंडी या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी चौथी उत्तीर्ण असावेत. उमेदवाराकडे बांधकाम कामाचा कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असावा. उमेदवाराकडे कोंकणी आणि मराठी भाषेचे ज्ञान असावे.
- कनिष्ठ विभाग लिपिक या पदासाठी एकूण 11 जागा रिक्त आहेत. साईट पर्यवेक्षक या पदासाठी एकूण एक जागा रिक्त आहे. सहाय्यक गवंडी या पदासाठी एकूण 01 जागा रिक्त आहे.
- सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 वर्षापेक्षा जास्त नसावे. अर्ज करणाऱ्या शासकीय उमेदवारांकरिता वयामध्ये पाच वर्ष सूट देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या नियमानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये सूट देण्यात येणार आहे.
- जाहिरातीत दिलेल्या पदांच्या पात्रतेचे आणि अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनाच सदरील भरती करिता अर्ज करता येणार आहेत.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 23 ऑक्टोबर 2024 ते 11 नोव्हेंबर 2024 या तारखे दरम्यान जन्माचा दाखला, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे, वैध रोजगार विनिमय नोंदणी पत्र, 15 वर्षाचे रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांवर पासपोर्ट साईज फोटो अर्जावर चिकटवायचा आहे. आणि दिलेल्या पत्त्यावर 11 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी पाच वाजायच्या अगोदर दिलेल्या पत्त्यावर पोहोच करायचे आहे.
- उमेदवारांनी सदरील भरती करिता पाठवलेले अर्ज मडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना संबोधलेले असले पाहिजे. त्याचबरोबर पाठवण्यात आलेले अर्ज नमुन्या प्रमाणे असणे गरजेचे आहे. आणि जाहिराती सोबत जोडायची कागदपत्रे उमेदवारांनी व्यवस्थित जोडली पाहिजेत. कागदपत्रे आणि अर्ज दिलेल्या नियमानुसार नसतील तर असे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- एकाच उमेदवाराला एक हून अधिक पदांसाठी अर्ज करायचा असेल तर उमेदवारांनी सेपरेट अर्ज करावेत. जे उमेदवार यापूर्वी शासकीय काम करत आहेत. आशा उमेदवारांनी आपले अर्ज देण्यात आलेल्या माध्यमांच्या द्वारे जमा करायचे आहेत.
- उमेदवारांनी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे.
- मडगाव नगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Madgaon Nagar Palika Bharti 2024 | मडगाव नगरपालिका येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- मडगाव नगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज पाठवायचा पत्ता जाहिरातीमध्ये दिलेला आहे. त्या पत्त्यावर जाऊन उमेदवारांनी अर्ज जमा करायचे आहेत किंवा पत्राद्वारे पाठवायचे आहेत.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा मडगाव नगरपालिका यांच्याकडून देण्यात आलेली नाही त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही लिंक द्वारे किंवा चुकीच्या वेबसाईट द्वारे भरतीसाठी अर्ज करायचा नाही. यामुळे उमेदवारांची फसवणूक होऊ शकते.
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत असताना अर्जाचा नमुना जाहिरातीचा शेवट देण्यात आलेला आहे. उमेदवाराने त्याप्रमाणेच अर्ज करायचा आहे. अर्ज लिहित असताना कोणीही खडाखोड करू नये. किंवा अर्ज अपूर्ण लिहू नये असे आढळल्यास उमेदवाराचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येईल.
- 11 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्यासाठी देण्यात आलेली अंतिम दिनांक आहे. या तारखेनंतर ऑफलाइन पद्धतीने मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- मडगाव नगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करायला सुरुवात करावी.
Madgaon Nagar Palika Bharti 2024 | मडगाव नगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- सदरील Madgaon Nagar Palika Bharti 2024 भरती करिता ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत आशा उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे. इतर कोणत्याही उमेदवारांना थेट पदावर नियुक्ती देण्यात येणार नाही.
- मुलाखतीला येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला मडगाव नगरपालिका यांच्याद्वारे TA / DA देण्यात येणार नाही.
- सदरील Madgaon Nagar Palika Bharti 2024 भरती च्या मुलाखती दरम्यान कोणत्याही उमेदवारांनी पदावर नियुक्त होण्याकरिता अनुचित प्रकार केला तर अशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
- मडगाव नगरपालिका यांच्याबाबत अधिक माहिती मिळवण्याकरिता उमेदवारांनी मडगाव नगरपालिकेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
Madgaon Nagar Palika Bharti 2024 | मडगाव नगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
- मडगाव नगरपरिषद येथील Madgaon Nagar Palika Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करण्याचा नमुना जाहिरातीच्या दुसऱ्या पानावर देण्यात आलेला आहे. या भरती करिता उमेदवारांनी अर्ज मुख्याधिकारी मडगाव नगरपालिका, मडगाव – गोवा यांना करायचा आहे. अर्ज करायच्या उजव्या कोपऱ्यामध्ये उमेदवारांनी स्वतःचा पासपोर्ट आकारातील सही केलेला फोटो चिकटवायचा आहे. सदरील भरतीसाठी कोणत्या पदाकरिता अर्ज करायचा आहे त्या पदाचे नाव उमेदवारांनी लिहिलेले असले पाहिजे. संबंधित पदाचा प्रवर्ग उमेदवारांनी लिहिलेला असणे गरजेचे आहे. या भरती संदर्भात जाहिरात उमेदवाराला मिळाली असेल तर त्या जाहिरातीचा जाहिरात क्रमांक उमेदवारांनी लिहायचा आहे. पहिल्या क्रमांकावर उमेदवारांनी स्वतःचे नाव ठळक अक्षरात लिहायचे आहे. दुसऱ्या क्रमांकावर उमेदवारांनी वडिलांचे किंवा पतीचे नाव लिहायचे आहे. तिसऱ्या क्रमांकावर उमेदवारांनी स्वतःची खरी जन्मतारीख लिहायची आहे. त्याच्यापुढे उमेदवारांनी स्वतःचे वय लिहायचे आहे. चौथ्या क्रमांकावर उमेदवारांनी महिला किंवा पुरुष यापैकी योग्य पर्यायाची निवड करायची आहे. जर उमेदवार विवाहित असेल तर किंवा नसेल तर त्या बाबतची स्थिती लिहायचे आहे. पाचव्या क्रमांकावर उमेदवारांनी स्वतःचा चालू पत्रव्यवहाराचा पत्ता लिहायचा आहे. सहाव्या क्रमांकावर उमेदवारांनी स्वतःचा चालू मोबाईल नंबर आणि चालू ईमेल आयडी लिहायचा आहे. सातव्या क्रमांकावर रोजगार विनिमय नोंदणी क्रमांक उमेदवारांनी लिहायचा आहे. आठव्या क्रमांकावर उमेदवारांनी स्वतःचे शैक्षणिक पात्रता दिलेल्या टेबल मध्ये व्यवस्थित लिहायचे आहे. नवव्या क्रमांकावर उमेदवारांनी कामाचा अनुभव लिहायचा आहे. दहाव्या क्रमांकावर स्वतःचे सेल्फ डिक्लेरेशन सही करून द्यायचे आहे.
- मडगाव नगरपरिषद, गोवा यांच्याकडून सदरील Madgaon Nagar Palika Bharti 2024 भरती मधून उमेदवारांची निवड कायमस्वरूपी चे संबंधित पदावर होणार आहे.
- मडगाव नगरपरिषद, गोवा येथील Madgaon Nagar Palika Bharti 2024 भरती संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.