District Hospital Pune Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण जिल्हा रुग्णालय, पुणे अंतर्गत निघालेल्या 35 जागांसाठी च्या भरती संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत. पुणे जिल्हा रुग्णालय, औंध येथील भरती मधून 35 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ” स्त्री सहाय्यकारी परिचारीका प्रसाविका (ए.एन.एम) ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे. सदरील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जिल्हा रुग्णालय, पुणे येथील भरती संदर्भात संपूर्ण माहिती खालील प्रमाणे.
- 35 रिक्त जागा जिल्हा रुग्णालय पुणे यांच्याद्वारे भरण्यात येणार आहेत.
- ” स्त्री सहाय्यकारी परिचारीका प्रसाविका (ए.एन.एम) ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड जिल्हा रुग्णालय भरती मधून केली जाणार आहे.
जिल्हा रुग्णालय, पुणे भरती 2024
District Hospital Pune Bharti 2024 | जिल्हा रुग्णालय, पुणे येथील भरती संदर्भात आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे आहे.
- स्त्री सहाय्यकारी परिचारीका प्रसाविका (ए.एन.एम) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या असणे आवश्यक आहे. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या राखीव आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 12 वी उत्तीर्ण करताना 45% गुण मिळालेले असणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांनी मुक्त विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण केलेली आहे. आशा उमेदवारांना सदरील भरतीसाठी अर्ज करता येणार नाही.
- सदरील District Hospital Pune Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता शुल्क 400 रुपये असणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता शुल्क 200 रुपये असणार आहे.
- या District Hospital Pune Bharti 2024 भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
- ” जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, चेस्ट हॉस्पीटल, तळमजला, एआरटी केंद्र औंध शेजारी, औंध, पुणे २७ ” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पत्राद्वारे केव्हा समक्ष उपस्थित राहून पाठवायचे आहेत.
- सदरील District Hospital Pune Bharti 2024 भरतीसाठी अर्ज 14 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणार आहे.
- जिल्हा रुग्णालय, पुणे यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
District Hospital Pune Bharti 2024 | जिल्हा रुग्णालय, पुणे येथील भरतीसाठी खालील नियम काळजीपूर्वक वाचा.
- जिल्हा रुग्णालय, पुणे येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.
- जिल्हा रुग्णालय, पुणे येथील भरतीसाठी जिल्हा रुग्णालय पुणे यांच्याकडून कोणतीही ऑनलाईन पद्धत देण्यात आलेली नाही.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणाऱ्या उमेदवारांनी स्वतःची जन्मतारीख, नाव, गाव, पत्ता इत्यादी गोष्टी बरोबर लिहायचे आहेत. यातील कोणतीही गोष्ट उमेदवाराकडून चुकीच्या स्वरूपाची भरण्यात आली. तर अशा उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.
- 18 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर उमेदवारांना भरती करिता अर्ज करता येणार नाहीत.
- जिल्हा रुग्णालय पुणे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे.
District Hospital Pune Bharti 2024 | जिल्हा रुग्णालय पुणे येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्या.
- जिल्हा रुग्णालय पुणे येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. आशा उमेदवारांमधून योग्य उमेदवार निवडले जातील.
- जिल्हा रुग्णालय पुणे येथील भरतीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवारास जिल्हा रुग्णालय पुणे यांच्याकडून TA / DA देण्यात येत नाही.
- जिल्हा रुग्णालय पुणे येथील भरतीदरम्यान कोणत्याही उमेदवाराने अनुचित प्रकार केला. तर त्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- सदरील भरती मधील पदावर काम करणारा उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सदृढ असावा.
- सदरील District Hospital Pune Bharti 2024 भरती संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्याकरिता जिल्हा रुग्णालय, पुणे यांच्या संकेतस्थळाला भेट द्या.
District Hospital Pune Bharti 2024 | जिल्हा रुग्णालय, पुणे येथील भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.
- जिल्हा रुग्णालय, पुणे येथील भरतीसाठी फक्त महिला उमेदवार अर्ज करू शकतात.
- एकूण 35 जागांपैकी अनुसूचित जातीसाठी पाच जागा रिक्त आहेत. अनुसूचित जमाती करिता तीन जागा रिक्त आहेत. विमुक्त जाती ( अ ) यांच्यासाठी एक जागा रिक्त आहे. भटक्या जमाती ( ब ) यांच्यासाठी एक जागा रिक्त आहे. भटक्या जमाती ( क ) यांच्यासाठी एक जागा रिक्त आहे. भटक्या जमाती ( ड ) यांच्याकरिता एक जागा रिक्त आहे. इतर मागासवर्ग करिता सहा जागा रिक्त आहेत. आर्थिक दुर्बल घटकांकरिता चार जागा रिक्त आहेत. खुल्या वर्गासाठी सहा जागा रिक्त आहेत. दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी दोन जागा आहेत. आशा सेविकांसाठी दोन जागा रिक्त आहेत.
- दिव्यांग उमेदवार आणि आशा स्वयंसेविका यांच्याकरिता उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्यांच्या जागेवर खुल्या प्रवर्गातील उमेदवार गुणवत्ता यादीनुसार भरण्यात येईल.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 ऑक्टोबर 2024 रोजी 17 वर्षे पूर्ण असले पाहिजेत. त्याचबरोबर उमेदवाराचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त नको.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल.
- अर्ज करणारा उमेदवाराविरुद्ध कोणत्याही न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल असलेला नसावा.
- 14 ऑक्टोबर 2024 ते 18 ऑक्टोबर 2024 या तारखे दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संपूर्ण भरलेले अर्ज स्वीकारले जातील.
- भरतीसाठी आलेल्या अपूर्ण अर्जांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली जाणार नाही.
- दिनांक 19 ऑक्टोबर 2024 रोजी भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल.
- दिनांक 21 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी एक वाजेपर्यंत भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी मुलाखत पात्र असलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल.
- सदरील District Hospital Pune Bharti 2024 भरतीसाठी येताना उमेदवारांना स्वखर्चाने यावे लागेल. मुलाखतीच्या ठिकाणी यायला उशीर झाल्यास कोणत्याही प्रकारचे कारण ऐकून घेतले जाणार नाही.
- ज्या आशा सेविकांना सदरील भरती मध्ये अर्ज करायचा आहे. त्यांच्याकडे आशा सेविका म्हणून काम केलेल्या चा तीन वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
- उमेदवारांनी प्रवेश अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रांची यादी लवकरच देण्यात येईल. उमेदवारांनी त्यानुसार अर्जासोबत कागदपत्रे जोडायचे आहेत.
- पुणे जिल्हा रुग्णालयाच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
District Hospital Pune Bharti 2024 | पुणे जिल्हा रुग्णालय, पुणे भरती संदर्भात महत्त्वाच्या तारखा खालील प्रमाणे.
- 14 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून अर्ज करायला सुरुवात होणार आहेत.
- 18 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे.
- 18 ऑक्टोबर 2024 तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- दिलेल्या तारखा नुसार सकाळी 10:00 ते सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत भरतीसाठी अर्ज स्वीकारले जातील.
- सदरील District Hospital Pune Bharti 2024 भरतीसाठी अर्ज कशा पद्धतीने सादर करायचा याबाबत संपूर्ण माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी कमीत कमी 45% गुणांनी 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
- समुपदेशनासाठी येणाऱ्या उमेदवारांनी स्वखर्चाने यायचे आहे. दिलेल्या तारखेला आणि वेळेत समुपदेशन साठी उमेदवार उपस्थित न राहिल्यास त्याची कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही.
- अर्ज केलेल्या उमेदवारांमधून योग्य उमेदवारांची निवड अनुशासन यानुसार आणि गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहे.
- जिल्हा रुग्णालय, पुणे यांच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा.
- जिल्हा रुग्णालय, पुणे येथील भरती संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.