Exim Bank Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण एक्झिम बँक यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या 138 जागांसाठी च्या भरती संदर्भात माहिती पाहणार आहोत. या भरती मधून 138 जागा विविध पदांकरिता भरल्या जाणार आहेत. 14 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. या भरती करिता इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. “प्रशासन, व्यवसाय विकास अधिकारी, अनुपालन, कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स व इतर” या पदांकरिता योग्य उमेदवार निवडावेत यासाठी सदरील Exim Bank Bharti 2024 भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. एक्झिम बँक येथील भरती करिता अधिक माहिती जाणून घेणाऱ्या उमेदवारांकरिता. खालील माहिती देण्यात आलेली आहे.
- 138 रिक्त जागांकरिता एक्झिम बँक यांच्याद्वारे Exim Bank Bharti 2024 भरती निघालेली आहे.
- प्रशासन, व्यवसाय विकास अधिकारी, अनुपालन, कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स व इतर ही पदे एक्झिम बँक यांच्या भरती मधून भरली जाणार आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे भरती.
Exim Bank Bharti 2024 | एक्झिम बँक येथील भरती करिता आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अटी खालील प्रमाणे.
- ऑफिसर ऍडमिनिस्ट्रेशन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून सिविल किंवा मेकॅनिकल अभियांत्रिकी पदाची पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. किंवा हॉटेल आणि हॉस्पिटॅलीटी मॅनेजमेंट, फॅसिलिटी मॅनेजमेंट या शाखेमधून पदव्युत्तर पदवी 50% मार्क्सने उत्तीर्ण केलेली असावी. जा उमेदवारांचे आर्मी बॅकग्राऊंड आहे आशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
- ऑफिसर ऍडमिनिस्ट्रेशन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे PSB / FI / PSU किंवा खाजगी कंपनीमध्ये 15 वर्षे काम केलेला अनुभव असणे गरजेचे आहे.
- ऑफिसर ऍडमिनिस्ट्रेशन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे MS-World, Excel याचे ज्ञान असणे गरजेचे आहे, विक्रेत्यांवर व्यवहार करण्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे, उमेदवाराकडे GST,, TDS आणि अकाउंटिंग यासंदर्भातल्या ज्ञान असणे गरजेचे आहे.
- बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून एमबीए फायनान्स किंवा मार्केटिंग मधून उत्तीर्ण केलेले असणे गरजेचे आहे. उमेदवारांनी दोन वर्षाची एमबीए पूर्णवेळ अभ्यासक्रमातून मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण केलेले असणे गरजेचे आहे. एमबीए मध्ये उमेदवाराला 50% गुण मिळालेले असणे गरजेचे आहे.
- बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पब्लिक सेक्टर बँक, ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूट, सेंट्रल गव्हर्मेंट, स्टेट गव्हर्मेंट, पब्लिक सेक्टर संस्था यापैकी कोणत्याही ठिकाणी कमीत कमी पाच वर्ष कामाचा अनुभव पाहिजे.
- बँकेच्या विविध सुविधा करिता नवीन ग्राहक शोधणे, आरबीआयच्या सर्व नियमांचे पालन करणे, वार्षिक आणि सहा महिन्याच्या ऑडिट रिपोर्ट बनवताना मदत करणे यांसारखी कामे बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर यांना करावी लागणार आहेत.
- ऑफिसर – कॉर्पोरेट कम्युनिकेशन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून कॉर्पोरेट कम्युनिकेशन / मास कम्युनिकेशन / जाहिरात / पत्रकारिता यापैकी कोणत्याही पदव्युत्तर पदवी 50% गुणांनी मिळवलेली असणे आवश्यक आहे.
- ऑफिसर – कॉर्पोरेट कम्युनिकेशन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कॉर्पोरेट हाऊस / मीडिया ऑर्गनायझेशन / ॲडव्हर्टायझिंग किंवा पब्लिक रिलेशन एजन्सी या क्षेत्रामध्ये काम केलेला कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
- ऑफिसर – कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी / सोशल सायन्स या शाखेमधून पदव्युत्तर पदवी 60% गुणांनी उत्तीर्ण केलेली असणे गरजेचे आहे.
- ऑफिसर – कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कामाचा कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव पाहिजे.
- ऑफिसर – डिजिटल टेक्नॉलॉजी या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन या शाखेची B.Sc / B.E / B.Tech यापैकी कोणती पदवी उत्तीर्ण केलेली असावी. किंवा उमेदवारांनी कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या शाखेची MCA / M.Tech यापैकी कोणती पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
- ऑफिसर – डिजिटल टेक्नॉलॉजी या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित कामाचा पाच वर्षाचा अनुभव पाहिजे.
- ऑफिसर – डिजिटल टेक्नॉलॉजी- इन्फ्रास्ट्रक्चर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन या शाखेची B.Sc / B.E / B.Tech यापैकी कोणतीही पदवी मिळवलेली असावी. उमेदवारांनी M.Tech पदवी CS / IT शाखेमधून मिळवलेली असावी. उमेदवाराकडे संबंधित कामाचा दोन वर्षाचा अनुभव असावा.
- ऑफिसर – डिजिटल टेक्नॉलॉजी- एप्लीकेशन मॅनेजर या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी B.Sc / B.Tech / B.E ही पदवी कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन या शाखेमधून 45% गुणांनी मिळवलेली असणे आवश्यक आहे. किंवा उमेदवाराने MCA / M.Tech पदवी CS / IT या शाखेमधून मिळवलेली आवश्यक आहे.
- OC – एन्व्हायरमेंटल सायन्स & गव्हर्नन्स या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, एन्व्हायरमेंट सायन्स या शाखेची पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी अकाउंटिंग सर्टिफिकेट मिळवलेल्या असणे गरजेचे आहे.
- ऑफिसर – एक्झिम मित्र या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी इकोनॉमिक्स मधून MA / M.Sc / Phd ही पदवी मिळवलेली असावी. उमेदवाराने इंटरनॅशनल ट्रेड / डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स / फायनान्शिअल इकॉनॉमिक्स या विषयांमधून स्पेशलायझेशन केलेल्या असणे गरजेचे आहे. उमेदवाराने पदवी मिळवताना कमीत कमी 60% गुण मिळवलेले असणे आवश्यक आहे.
- Exim Bank Bharti 2024 | ऑफिसर – ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट या पदाकरिता उमेदवाराने MBA / PGDBA ही पदवी ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट शाखेतून मिळवलेली असणे गरजेचे आहे. सदरील पदवी उमेदवाराने दोन वर्षाच्या नियमित अभ्यासक्रमाने मिळवलेली असावी.
- ऑफिसर – लीगल या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कायदेविषयक पदवीधर मिळवलेली असावी. त्याचबरोबर उमेदवार बार कौन्सिल ऑफ इंडियाला रजिस्टर असावा. पदवी मिळवताना उमेदवाराला कमीत कमी 50 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे सदरील कामासंदर्भात दोन वर्षाचा अनुभव असावा.
- ऑफिसर – लोन ऑपरेशन & लोन मॉनिटरिंग या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून MBA / PGDBA ही पदवी फायनान्स शाखेतून मिळवलेली असावी. किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर अकाउंटंट ऑफ इंडिया मधून चार्टर अकाउंटंट ही पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे.
- ऑफिसर – मार्केट ॲडव्हायझर सर्विसेस या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी MBA / MSW / PGDBA ही पदवी मार्केटिंग / सोशल वर्क शाखेतून मिळवलेली असावी. उमेदवाराने सदरील पदवी नियमित दोन वर्षाच्या अभ्यासक्रमाने पूर्णवेळ उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवाराकडे पब्लिक सेक्टर बँक / ऑल इंडिया फायनान्शिअल इन्स्टिट्यूट / सेंट्रल गव्हर्नमेंट / स्टेट गव्हर्मेंट / पब्लिक सेक्टर कंपनी यांच्याकडे काम केलेला कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव पाहिजे.
- ऑफिसर – प्रोजेक्ट मॅनेजमेंट फोर इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुप या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी BE / B.Tech ही पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 50% गुणासह उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- सदरील Exim Bank Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण मुंबई शहर असणार आहे.
- एक्झिम बँक यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा.
- एक्झिम बँक येथील Exim Bank Bharti 2024 भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
Exim Bank Bharti 2024 | एक्झिम बँक येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- एक्झिम बँक येथील Exim Bank Bharti 2024 भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा एक्झिम बँक यांच्याकडून देण्यात आलेले आहे.
- सदरील भरती करिता एक्झिम बँक यांच्याकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही.
- एक्झिम बँक यांच्याकडून देण्यात आलेल्या पात्रतेची पूर्तता जे उमेदवार करू शकतात अशाच उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
- 14 ऑक्टोंबर 2024 ही एक्झिम बँक द्वारे अर्ज करण्याची अंतिम तारीख देण्यात आलेली आहे.
- एक्झिम बँक यांच्याद्वारे देण्यात आलेल्या सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक पाळायचे आहेत.
- एक्झिम बँक येथील Exim Bank Bharti 2024 भरती संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.