Mahapareshan Pune Bharti 2024 | महापारेषण पुणे अंतर्गत 68 रिक्त जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Mahapareshan Pune Bharti 2024  नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, पुणे यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड येथील होणाऱ्या भरती मधून 68 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सदरील भरती मधून ‘ शिकाऊ उमेदवार’ या पदासाठी योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत. सदरील होणाऱ्या भरती करिता 24, 25 आणि 31 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, पुणे येथील भरतीसाठी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. अधिक माहिती करिता उमेदवारांनी खालील देण्यात आलेला लेख काळजीपूर्वक वाचावा.

  • 68 रिक्त जागा महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड यांच्याद्वारे भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.
  • ‘ शिकाऊ उमेदवार ‘ या पदाकरिता योग्य उमेदवार निवडण्यासाठी महापारेषण, पुणे यांच्याकडून भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था येथे भरती

Mahapareshan Pune Bharti 2024 | महापारेषण पुणे येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे आहे.

  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. व त्याचबरोबर उमेदवाराने मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधून इलेक्ट्रिशियन किंवा वीजतंत्री या शाखेचा आयटीआय उत्तीर्ण केलेला असावा.

     

  • या Mahapareshan Pune Bharti 2024 भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मागासवर्गीय उमेदवारांना वयामध्ये पाच वर्ष सूट देण्यात आलेली आहे.

     

  • Mahapareshan Pune Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवारांना शुल्क नाही.

     

  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना महापारेषण यांच्या नियमानुसार वेतन मिळणार आहे.

     

  • सदरील Mahapareshan Pune Bharti 2024 भारती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.

     

  • Mahapareshan Pune Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्जासोबत 10वी उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक, आयटीआय परीक्षा उत्तीर्ण केलेल्या चे सर्व सेमिस्टर चे प्रमाणपत्र, ओळखपत्र म्हणून आधार कार्ड ऑनलाइन अपलोड करायचे आहे.

     

  • या उमेदवारांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे आशा उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
Mahapareshan Pune Bharti 2024
Mahapareshan Pune Bharti 2024
  • महापारेषण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पाहण्यासाठी उमेदवारांनी पुढे क्लिक करावी. जाहिरात क्र.1   जाहिरात क्र.2   जाहिरात क्र.3
  • महापारेषण, पुणे येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी पुणे जिल्ह्यातील भाटघर, कामथडी, वरसगाव, तळेगाव, उर्से, लोणावळा, पिरंगुट, अंदालेक, पवना, अउदा संवसु विभाग-1, मंचर, चाकण, आळेफाटा, रांजणगाव, कठापूर, खेड सिटी, पिंपळगाव, नारायणगाव, शिरूर, सणसवाडी, कुरळी, कवठे यमाई या ठिकाणी उमेदवारांना काम असेल.
  • ज्या उमेदवारांना सदरील भरतीचे प्रशिक्षण घ्यायचे आहे आशा उमेदवारांनी प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये कोणत्याही तांत्रिक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये डिप्लोमा किंवा अभियांत्रिकी पदवी साठी ऍडमिशन घेतलेले नसावे. भरतीसाठी आवश्यक असलेले कागदपत्रे जर उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अपलोड केलेली नसतील तर अशा उमेदवाराचा विचार केला जाणार नाही त्याचा अर्ज रद्द करण्यात येईल. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरत असताना देण्यात आलेल्या ईमेल आयडी द्वारे निवड झालेल्या कळवण्यात येईल. सदरील भरती ची जाहिरात रद्द करण्याचे केव्हा जाहिरातीमध्ये काही बदल करण्याचा पूर्णपणे अधिकार महापारेषण यांच्याकडे आहे. भरती मध्ये बदल झाल्यास उमेदवाराची कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही. महापारेषण येथे शिकाऊ उमेदवार म्हणून प्रशिक्षण घेतले असल्यामुळे महापारेषण या ठिकाणी उमेदवाराला कोणत्याही प्रकारची नोकरी मिळण्याचा अधिकार प्राप्त होणार नाही.

Mahapareshan Pune Bharti 2024 | महापारेषण पुणे येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.

  • महापारेषण पुणे येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची वेबसाईट वरती देण्यात आलेली आहे. त्याच्या द्वारे उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.

     

  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याचा पत्ता महापरेशन पुणे यांच्याकडून देण्यात आलेला नाही. महापारेषण पुणे यांच्याद्वारे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सोय उमेदवारांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराने ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू नये.

     

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरत असताना उमेदवारांनी स्वतःची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी. त्यामध्ये शैक्षणिक पात्रता, वय, जन्मतारीख यांसारख्या गोष्टी अगदी व्यवस्थित लिहायचे आहेत. चुकीची माहिती लिहिणाऱ्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे.

     

  • 31 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर कोणत्याही उमेदवाराला अर्ज करता येणार नाही.

     

  • महापरेशन पुणे येथील Mahapareshan Pune Bharti 2024 भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरातीची पीडीएफ उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी. आणि समजून घ्यावी. सदरील पात्रता लक्षात आल्यानंतरच उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करायला सुरुवात करायची आहे.

Mahapareshan Pune Bharti 2024 | महापारेषण पुणे येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • महापरेशन पुणे येथील अप्रेंटिस पदाच्या भरती करिता ज्या उमेदवारांनी ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अर्ज केलेले आहेत असे उमेदवारच भरती मधून निवडले जाणार आहेत. इतर कोणत्याही उमेदवाराला भरतीमध्ये संधी मिळणार नाही.

     

  • महापारेषण पुणे येथील भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याकरिता येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला महापारेषण पुणे यांच्याकडून कसल्याही प्रकारचा TA / DA देण्यात येणार नाही.

     

  • महापारेषण पुणे येथील Mahapareshan Pune Bharti 2024 भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवारा द्वारे अनुचित प्रकार घडला तर अशा उमेदवारावर संस्थे कडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

     

  • महापरेशन पुणे यांच्या अधिकृत संकेतस्थळावर सदरील भरतीच्या संदर्भात अधिक माहिती देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे महापारेषण या संस्थेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट द्यावी.

Mahapareshan Pune Bharti 2024 | महापरेशन पुणे येथील भरती करिता अधिक माहिती खालील प्रमाणे.

  • महाराष्ट्रातील वीज पारेषण मधील सर्वात महत्त्वाची सरकारी कंपनी म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड ही आहे. या संस्थेची स्थापना दिनांक 6 जून 2005 रोजी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य वीज मंडळाची ज्यावेळेस पुनर्रचना करण्यात आली. त्या पुनर्रचना मध्ये वीज निर्मिती, पारेषण आणि वितरण या तीन घटकांमध्ये महाराष्ट्र राज्य वीज मंडळाची विभागणी करण्यात आलेली होती. त्यातील पारेषण घटकांमधून महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड ची स्थापना झाली. महाराष्ट्र राज्यातील सर्व गावांमध्ये आणि सर्व लोकांपर्यंत सुरक्षित रित्या आणि कायमस्वरूपी वीज पुरवठा करण्याचे काम या संस्थेला देण्यात आलेले आहे.

     

  • महाराष्ट्र राज्यातील अनेक उद्योग, व्यवसाय आणि नागरिकांची घरे, शेती महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड च्या कामामुळे अखंड वीज सेवेचा लाभ घेत आहेत. वीज वाहून नेण्या सोबत वीज पारेषण च्या क्षेत्रामध्ये प्रगती करण्याचे काम सदरील कंपनी करत आहे. वीज चोरी करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे, वीज वितरणा नवीन उपकेंद्रे उभा करणे, जुनी झालेली यंत्रणा नवीन करणे, वीज दरामध्ये सुधारणा करणे यांसारखी कामे महाराष्ट्र वीज पारेषण यांच्याकडून केली जातात.
  • महाराष्ट्र राज्य विद्युत वीज पारेषण कंपनी लिमिटेड या संस्थेचे तंत्रज्ञान, इंजिनीयर आणि मॅनेजमेंट मधील सदस्य यांच्याद्वारे कंपनीचे काम पार पाडले जाते. या सर्वांचा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्य विद्युत विज पारेषण कंपनीच्या द्वारे वीज वितरण आणि पारेषण ची असणारी व्यवस्था मजबूत करणे हा आहे. सरकारच्या बदलत्या धोरणाला लक्षात घेऊन या कंपनीला काम करावे लागते. महाराष्ट्र राज्य व्यतिरिक्त देशातील इतर राज्यांमध्ये या कंपनीने एक आदर्श घालून दिलेला आहे.

Leave a Comment