NCL Pune Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण CSIR – राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे निघालेला भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून 18 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक 12 नोव्हेंबर 2024 ही देण्यात आलेली आहे. सदरच्या होणाऱ्या भरती मधून ” ट्रेड अप्रेंटिस ” या पदाकरिता योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे यांच्या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहितीसाठी खाली देण्यात आलेल्या लेख काळजीपूर्वक वाचावा.
- 18 रिक्त जागा भरण्याकरिता CSIR – राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथील भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे.
- ‘ ट्रेड अप्रेंटिस’ या पदासाठी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे यांच्याकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था येथे भरती.
NCL Pune Bharti 2024 | CSIR – राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे.
- पेंटर ( सामान्य ), कारपेंटर, मेकॅनिक डिझेल, फिटर, ड्राफ्ट मन ( मेकॅनिकल ), प्लंबर, वेल्डर ( गॅस आणि इलेक्ट्रिक ), इलेक्ट्रिशियन, सेक्रेटरी प्रॅक्टिस या शाखेतील शिकाऊ उमेदवारांकरिता सदरील भरती मधून संधी मिळणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी NCVT मान्यताप्राप्त संस्थेमधून आयटीआय पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 12 नोव्हेंबर 2024 रोजी 24 वर्षापर्यंत असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासन मान्यतेनुसार वयामध्ये सूट देण्यात येणार आहे. SC / ST प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयामध्ये पाच वर्ष सूट देण्यात येणार आहे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयामध्ये तीन वर्षे सूट देण्यात येणार आहे. त्याकरिता ओबीसी प्रवर्गातील उमेदवाराकडे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. माजी सैनिक असणाऱ्या उमेदवारांना वयामध्ये 10 वर्षे सूट देण्यात येणार आहे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.
- यावरती मधून योग्य उमेदवारांची निवड करण्याकरिता राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा यांच्याकडून मुलाखत घेण्यात येणार आहे.
- भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना दरमहा 7700 रुपये ते 8050 रुपये वेतन मिळणार आहे.
- राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा यांच्याकडून सदरील भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याकरिता एथे क्लिक करा.
- पेंटर या पदासाठी दोन जागा रिक्त आहेत. कार्पेंटर या पदाकरिता दोन जागा रिक्त आहेत. मेकॅनिक डिझेल या पदाकरिता एक जागा रिक्त आहे. फिटर या पदासाठी दोन जागा रिक्त आहेत. ड्राफ्ट मन या पदासाठी एक जागा रिक्त आहे. प्लंबर या पदाकरिता एक जागा रिक्त आहे. गॅस आणि इलेक्ट्रिक वेल्डर या पदाकरिता चार जागा रिक्त आहेत. इलेक्ट्रिशन पदाकरिता चार जागा रिक्त आहेत. सेक्रेटरी प्रॅक्टिस या पदाकरिता दोन जागा रिक्त आहेत.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांकरिता प्रशिक्षण कालावधी एक वर्षाचा असणार आहे.
- एस सी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांकरिता रिक्त असलेल्या जागा मध्ये एसटी आणि एससी प्रवर्गातील उमेदवार भरण्यात येतील. परंतु जर या प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर आशा वेळेस एस सी आणि एसटी प्रवर्गा व्यतिरिक्त इतर प्रवर्गातील उमेदवारांना संधी देण्यात येईल.
- ओबीसी प्रवर्गात असणाऱ्या जागेमध्ये ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांच्या उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. परंतु ओबीसी उमेदवार उपलब्ध न झाल्यास अशा वेळेस ओबीसी नसलेल्या उमेदवारांना संधी देण्यात येईल.
- एस सी / एसटी प्रवर्गातील ज्या उमेदवारांना सामाजिक आरक्षणाचा फायदा घ्यायचा आहे आशा उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षणाचा फायदा घ्यायचा आहे आशा उमेदवारांकडे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र 2024-25 या वर्षाचे असणे आवश्यक आहे.
- सदरील भरती मधील एकूण पदांपैकी 4% जागा दिव्यांग उमेदवारांकरिता असणार आहेत.
NCL Pune Bharti 2024 | CSIR – राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकरिता सूचना खालीलप्रमाणे.
- CSIR – राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथील करीता इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इतर कोणत्याही पद्धतीने इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचे नाहीत. अर्ज करण्याची लिंक जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी त्याद्वारे अर्ज करायचा आहे.
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे यांच्याकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी ऑनलाइन देण्यात आलेल्या पद्धतीनुसारच अर्ज करायचा आहे. संस्थेच्या पत्त्यावर कोणत्याही उमेदवारांनी अर्ज करायचा नाही.
- ऑनलाइन अर्ज करत असताना सर्व उमेदवारांनी जाहिरातीमध्ये स्वतःची संपूर्ण माहिती आणि शैक्षणिक तपशील योग्य आणि बरोबर लिहायचा आहे. चुकीची माहिती लिहिणाऱ्या उमेदवाराचा अर्ज राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे यांच्याकडून रद्द करण्यात येणार आहे. अर्ज रद्द केल्यास त्याला पूर्णपणे उमेदवार जबाबदार असेल.
- 12 नोव्हेंबर 2024 ही सगळी भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. या तारखेनंतर कोणत्याही उमेदवाराला अर्ज करता येणार नाही. याची दक्षता सर्वांनी घ्यावी.
- राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. जाहिरात काळजीपूर्वक वाचून पूर्णपणे समजून घेऊन त्यानंतरचा अर्ज करायला सुरुवात करायची आहे.
NCL Pune Bharti 2024 | CSIR – राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथील करीता अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेले आहेत. असे उमेदवार सदरील भरती करिता पात्र ठरणार आहेत. इतर कोणत्याही उमेदवाराला या भरतीच्या मुलाखतीमध्ये अर्ज न करता प्रवेश मिळणार नाही. त्याचप्रमाणे अर्ज न करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला थेट पदावर नियुक्ती मिळणार नाही.
- राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथील भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्याकरिता आलेल्या कोणत्याही उमेदवाराला संस्थे कडून कसल्याही स्वरूपाचा TA / DA देण्यात येणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी.
- राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे यांच्या भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवाराने अनुचित प्रकार केला तर अशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. त्याचप्रमाणे त्या उमेदवाराचा अर्ज सुद्धा रद्द करण्यात येणार आहे.
- राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे यांच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. भेट देऊन संपूर्ण माहिती समजून घ्यायची आहे.
- सदरील भरती मधून योग्य उमेदवार निवडण्याकरीता दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोजी भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या तारखेला सकाळी 8:30 वाजल्यापासून ते 10:00 वाजेपर्यंत उमेदवारांनी रिपोर्टिंग करायचे आहे. ” ESU, वर्कशॉप, CSIR- राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, डॉक्टर होमी भाभा रोड, पाषाण रोड, पुणे – 411 008 ” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
- या भरती करिता येणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन यायचे आहेत यामध्ये प्रामुख्याने ओरिजनल कागदपत्रे आणि ओरिजनल कागदपत्रांचे दोन सत्य प्रती केलेले सेट सोबत घेऊन यायचे आहेत. 10 वी उत्तीर्ण मार्कशीट, जन्माचा दाखला, आयटीआय पासिंग सर्टिफिकेट, पॅन कार्ड, आधार कार्ड, दोन पासपोर्ट साईज फोटो, कास्ट सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला, क्वालिफाय इन सर्टिफिकेट ( माजी सैनिकांसाठी ), दिव्यांग प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे उमेदवारांनी सोबत घेऊन यायचे आहेत.