Ordnance Factory Medak Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण आयुध निर्मिती कारखाना येथे निघालेल्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून 86 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. “कनिष्ठ व्यवस्थापक, डिप्लोमा तंत्रज्ञ, सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक” या पदांकरिता योग्य उमेदवारांची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. 29 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आयुध निर्मिती कारखाना येथील भरती करिता उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे. अधिक माहिती समजून घेण्याकरिता खालील देण्यात आलेला लेख वाचावा.
- 86 रिक्त जागा भरण्याकरिता आयुध निर्मिती कारखाना यांच्याकडून भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
- आयुध निर्मिती कारखाना यांच्याकडून “कनिष्ठ व्यवस्थापक, डिप्लोमा तंत्रज्ञ, सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक” या पदांकरिता योग्य उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया येथे भरती
Ordnance Factory Medak Bharti 2024 | आयुध निर्मिती कारखाना येथील भरती संदर्भात आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे.
आयुध निर्माणी (Ordnance Factory) मेडक येथील कारखान्यांमध्ये “कनिष्ठ व्यवस्थापक, डिप्लोमा तंत्रज्ञ, सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक” या पदांकरिता योग्य उमेदवार निवडण्यासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत. सदरच्या होणाऱ्या भरती मधून एकूण 86 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. बेरोजगार उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2024 आयुध निर्माण, मेडक यांच्याकडून देण्यात आलेली आहे.
जर तुम्हाला सरकारी नोकरी पाहिजे असेल तर सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची संपूर्ण माहिती पाणी देण्यात आलेली आहे.
भरतीचा तपशील (Job Details)
पदांची माहिती:
- कनिष्ठ व्यवस्थापक (Junior Manager)
- डिप्लोमा तंत्रज्ञ (Diploma Technician)
- सहाय्यक (Assistant)
- कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant)
पदसंख्या:
एकूण 86 जागा
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):
पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगळी आहे.
- कनिष्ठ व्यवस्थापक: सदरील Ordnance Factory Medak Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी Mechanical Engineering/Mechatronics मधून First Class अभियांत्रिकी पदवी मिळवलेले असणे आवश्यक आहे.
- डिप्लोमा तंत्रज्ञ: या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून अभियांत्रिकी डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा.
- सहाय्यक: या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून फर्स्ट क्लास पदवी उत्तीर्ण केलेली असावी. त्याचबरोबर अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एक वर्षाचा संबंधित कामाचा अनुभव असावा.
- कनिष्ठ सहाय्यक: सदरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून HSC (12वी) उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे. आणि उमेदवाराकडे टायपिंगचे प्रमाणपत्र / डिप्लोमा इन कमर्शियल अँड कॉम्प्युटर प्रॅक्टिस प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा (Age Limit):
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 वर्षे (सरकारी नियमांनुसार आरक्षित प्रवर्गाला सवलत मिळेल) पर्यंत असणे आवश्यक आहे.
- वय मोजण्यासाठी Age Calculator वापरा.
वेतनश्रेणी (Salary Details):
पदांनुसार वेतनश्रेणी खालीलप्रमाणे आहे:
- कनिष्ठ व्यवस्थापक या पदावर व्यक्त होणाऱ्या उमेदवाराला दरमहा ₹30,000/- वेतन मिळणार आहे.
- डिप्लोमा तंत्रज्ञ पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला ₹23,000/- दरमहा वेतन मिळणार आहे.
- सहाय्यक या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला दरमहा ₹23,000/- पगार मिळणार आहे.
- कनिष्ठ सहाय्यक या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला ₹21,000/- मिळणार आहेत.
अर्ज कसा करावा? (How to Apply)
अर्ज प्रक्रिया (Application Process):
- Ordnance Factory Medak Bharti 2024 भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज सांगितलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवावा.
- अर्जामध्ये उमेदवारांनी माहिती संपूर्ण आणि योग्य द्यायचे आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता:
डेप्युटी जनरल मॅनेजर/एचआर,
ऑर्डनन्स फॅक्टरी मेडक,
येड्दुमैलाराम,
जिल्हा: संगारेड्डी,
तेलंगणा – ५०२२०५
अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचा:
- Ordnance Factory Medak Bharti 2024 भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी जाहिरात वाचल्यानंतरच अर्ज भरा.
- अर्ज करायच्या अंतिम तारखेनंतर मिळालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
- अपूर्ण अर्ज बाद करण्यात येतील.
महत्वाच्या तारखा (Important Dates):
- अर्ज करण्याची सुरुवात जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून आहे.
- शेवटची तारीख: 29 नोव्हेंबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
अर्जासाठी उपयोगी लिंक (Useful Links):
भरतीसाठी Tips:
- अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रे आणि इतर आवश्यक माहिती तयार ठेवावी.
- अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादेची खात्री करून स्वतःचे वय तपासावे.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पोस्ट करताना योग्य पत्त्यावर पाठवायचे आहेत.
Ordnance Factory Medak Bharti 2024 भरतीसंबंधित वेळोवेळी अपडेट्स मिळवण्यासाठी उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट द्यावी.
सामान्य प्रश्न (FAQs):
1. अर्ज कसा पाठवायचा?
अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा आहे. अर्ज पोस्टाने पाठवावा.
2. कोणत्या पदांसाठी भरती आहे?
कनिष्ठ व्यवस्थापक, डिप्लोमा तंत्रज्ञ, सहाय्यक, आणि कनिष्ठ सहाय्यक पदांसाठी भरती आहे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
29 नोव्हेंबर 2024 ही शेवटची तारीख आहे.
4. वेतन किती आहे?
पदांनुसार वेतन ₹21,000/- ते ₹30,000/- पर्यंत आहे.
Ordnance Factory Bharti 2024 | आयुध निर्मिती कारखाना मेडक येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- आयुध निर्मिती कारखाना येथील Ordnance Factory Medak Bharti 2024 भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने जाहिरातीत देण्यात आलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज पोस्टाद्वारे किंवा कुरियर द्वारे दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
- आयुध निर्मिती कारखाना येथील Ordnance Factory Medak Bharti 2024 भरती करिता इच्छुक उमेदवारांनी आपल्या अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे नाहीत. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणती सुविधा इच्छुक उमेदवारांकरिता देण्यात आलेली नाही. इतर कोणत्याही फसव्या वेबसाईट द्वारे जेव्हा पोर्टल द्वारे उमेदवारांनी आपले अर्ज करायचे नाहीत.
- आयोध निर्मिती कारखाना भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्ज मध्ये कोणत्याही प्रकारची खडाखोड करायची नाही. अर्जामध्ये खडाखोड केलेली असल्यास उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल. अपूर्ण लिहिणाऱ्या चा अर्ज बाद करण्यात येणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी स्वतःचे नाव आणि शैक्षणिक पात्रता बरोबर लिहायचे आहे. चुकीची लिहिणार्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे.
- 29 नोव्हेंबर 2024 सदरील Ordnance Factory Medak Bharti 2024 भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. तारखेनंतर मिळालेले कोणतेही अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- आयुध निर्मिती कारखाना यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरातीची पीडीएफ उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून समजून घ्यावी त्यानंतरच इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
- आयुध निर्मिती कारखाना येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत आशा उमेदवारांमधून योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. इतर कोणत्याही उमेदवाराला थेट अर्ज न करता पदावर नियुक्त करण्यात येणार नाही. त्याचप्रमाणे भरतीच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा सहभागी होता येणार नाही.
- आयुध निर्मिती कारखाना येथील भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला संस्थे कडून कसल्याही प्रकारचा TA / DA देण्यात येणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे.
- आयुध निर्मिती कारखाना येथील भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवाराने जर अनुचित प्रकार केला तर अशा उमेदवारावर सदरील संस्थेकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे अशा उमेदवाराचा अर्ज देखील रद्द करण्यात येईल.
- आयुध निर्मिती कारखाना यांच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी संस्थेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. भेट देण्यासाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- आयुध निर्मिती कारखाना येथील भरतीसाठी वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.