SIDBI Bharti 2024 | स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया येथे भरती

SIDBI Bharti 2024  नमस्कार मित्रांनो आज आपण स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया येथे निघालेल्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून 72 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. “सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ‘अ’, व्यवस्थापक ग्रेड ‘बी’” या पदांकरिता योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 2 डिसेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. या भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया येथील भरती करिता प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. अधिक माहिती करिता उमेदवारांनी खालील देण्यात आलेला लेख वाचावा.

Table of Contents

SIDBI Bharti 2024 | स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया येथील भरती करिता आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे.

स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) भरती 2024: संपूर्ण माहिती

स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) येथील होणाऱ्या SIDBI Bharti 2024  भरती मधून “सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ‘अ'” आणि “व्यवस्थापक ग्रेड ‘बी'” या पदांकरिता 72 जागा भरल्या जाणार आहेत त्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. ही एक उत्तम संधी आहे ज्यामध्ये पात्र उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध आहे.

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी

SIDBI Bharti 2024
SIDBI Bharti 2024

पदांची माहिती आणि पदसंख्या

1. सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ‘अ’:

  • पदसंख्या: 50
  • शैक्षणिक पात्रता: अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केलेली असावी.

2. व्यवस्थापक ग्रेड ‘बी’:

  • पदसंख्या: 22
  • शैक्षणिक पात्रता: सदरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केलेली असावी.

भरतीसाठी पात्रता आणि अटी

1. वयोमर्यादा:

  • 8 नोव्हेंबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवाराचे वय 30 वर्षापेक्षा जास्त नसावे.

2. शैक्षणिक पात्रता:

  • दोन्ही पदांसाठी किमान पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

3. अनुभव:

  • व्यवस्थापक ग्रेड ‘बी’ पदासाठी अनुभवाची आवश्यकता असू शकते. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात तपासा. जाहिरात समजून घ्या.

नोकरीचे ठिकाण आणि पगार

1. नोकरीचे ठिकाण:

  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र) येणार आहे.

2. वेतनश्रेणी:

  • सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ‘अ’:
  • या पदाकरिता उमेदवाराचे वेतन ₹44,500/- पासून सुरू होणार आहे. यामध्ये वेतन वाढीचा कालावधी 17 वर्षांपर्यंत आहे. अंदाजे मासिक पगार ₹1,00,000/- आहे.
  • व्यवस्थापक ग्रेड ‘बी’:
  • या पदाकरिता उमेदवाराचे वेतन ₹52,000/- पासून सुरू होणार आहे. यामध्ये वेतन वाढीचा कालावधी 16 वर्षांपर्यंत आहे. अंदाजे मासिक पगार ₹1,15,000/- आहे.

स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया येथील भरतीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे

  1. ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: सदरील भरतीसाठी उमेदवारांनी 08 नोव्हेंबर 2024 या तारखेपासून अर्ज करायचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक 02 डिसेंबर 2024 ही आहे.
  3. वयोमर्यादा काप-ऑफ तारीख: 08 नोव्हेंबर 2024 या तारखेपासून उमेदवाराचे वय मोजण्यात येणार आहे.
  4. ऑनलाईन परीक्षा (Phase I): 22 डिसेंबर 2024
  5. ऑनलाईन परीक्षा (Phase II): 19 जानेवारी 2025
  6. मुलाखत (Tentative): मुलाखतीची तारीख अजून देण्यात आलेली नाही परंतु मुलाखत फेब्रुवारी 2025 दरम्यान घेण्यात येईल.

स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे

1. ऑनलाईन अर्ज:

  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच सादर करायचा आहे.
  • अधिकृत वेबसाईटवर (https://www.sidbi.in) दिलेल्या लिंकवरून अर्ज करा.

2. अर्ज करण्याचे टप्पे:

  • Step 1: SIDBI च्या अधिकृत जाहिरातीत दिलेल्या वेबसाईटवर जा.
  • Step 2: “Careers” सेक्शनमध्ये भरतीसाठी देण्यात आलेली जाहिरात शोधा.
  • Step 3: जाहिरात संपूर्ण वाचून अर्जासाठी दिलेली लिंक क्लिक करा.
  • Step 4: अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक ती माहिती भरावी आणि कागदपत्रं अपलोड करावेत.
  • Step 5: ऑनलाइन पद्धतीने अर्जाची फी जमा करून अर्ज सबमिट करावा.

3. अर्ज करण्यापूर्वी तपासायच्या गोष्टी:

  • उमेदवाराने स्वतःचे सर्व आवश्यक कागदपत्रं आणि फोटो स्कॅन करून ठेवावेत.
  • अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भरलेल्या अर्जाची प्रिंट घ्यावी.

SIDBI भरती मधून उमेदवार निवडण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे

1. फेज I – ऑनलाइन परीक्षा:

  • प्रश्न प्रकार: बहुपर्यायी चाचणी
  • विषय:
  • इंग्रजी भाषा
  • Quantitative Aptitude
  • Reasoning Ability
  • चालू घडामोडी (विशेषतः बँकिंग आणि अर्थशास्त्र).

2. फेज II – ऑनलाइन परीक्षा:

  • उमेदवाराकडे असणाऱ्या अधिक विशिष्ट ज्ञानाची चाचणी घेतली जाईल.

3. मुलाखत (Interview):

  • ज्या उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा पास केलेली आहे आशा उमेदवारांनी मुलाखतीला यायचे आहे.

SIDBI येथे नोकरी मिळाल्याचे फायदा खालील प्रमाणे.

  1. स्थिर नोकरी:
  2. SIDBI मध्ये नोकरी तुम्हाला वेतन चांगल्या असल्यामुळे आर्थिक स्थैर्य आणि प्रतिष्ठा उमेदवाराला प्राप्त होते.
  3. पगार व भत्ते:
  4. चांगल्या वेतनासोबतच काम करणाऱ्या उमेदवारांना विविध भत्ते जसे की HRA, DA, आणि इतर फायदे मिळतात.
  5. करिअर ग्रोथ:
  6. SIDBI मध्ये पदोन्नतीसाठी खूप चांगल्या संधी उमेदवाराला मिळत असतात.
  7. सामाजिक प्रतिष्ठा:
  8. पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना सरकारी बँकांमध्ये नोकरी मिळणार आहे त्यामुळे समाजात विशेष मान्यता मिळणार आहे.

SIDBI भरती 2024 संदर्भातील महत्त्वाच्या लिंक

स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया येथील भरती करिता इच्छुक उमेदवारांना सूचना खालील प्रमाणे.

  • स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया येथील SIDBI Bharti 2024  भरती साठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची वेबसाईट उमेदवारांना जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून तेथील वेबसाईट द्वारे सदरील भरती करिता अर्ज करायचा आहे.
  • स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया येथील भरती करिता उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकत नाहीत. ऑफलाइन अर्ज करण्याची कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी आपले अर्ज कंपनीच्या पत्त्यावर पाठवायचे नाहीत. असे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया येथील SIDBI Bharti 2024  भरती करिता ऑनलाईन अर्ज करत असताना उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची खडाखोड करायची नाही. चुकीची माहिती लिहिणाऱ्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी स्वतःची संपूर्ण माहिती बरोबर लिहायचे आहे.
  • 2 डिसेंबर 2024 ही सदरील SIDBI Bharti 2024  भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. या तारखेनंतर ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा बंद करण्यात येणार आहे.
  • स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया अखिल भारतीय करिता अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात संपूर्ण वाचल्यानंतर उमेदवारांनी अर्ज करायला सुरुवात करायची आहे.
  • स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया येथील भरतीच्या प्रक्रियेमध्ये ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे अशा उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. इतर कोणत्याही उमेदवारांना सदरील भरती मध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. प्रवेश मिळवण्याकरिता उमेदवारांनी सर्वप्रथम ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
  • स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया येथील SIDBI Bharti 2024 भरतीच्या प्रक्रियेमध्ये किंवा मुलाखतीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला संस्थे कडून TA / DA देण्यात येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे.
  • स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया येथील SIDBI Bharti 2024  भरती करिता पदावर नियुक्त होण्यासाठी कोणत्याही उमेदवारांनी जरा अनुचित प्रकार केला. तर आशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अशा उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे.
  • स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया या कंपनी संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

Leave a Comment